Korea Masters 2026: पहिला गेम गमावला, पण हार मानली नाही; अश्मिता चालिहाने थाटात जिंकला पहिला BWF वर्ल्ड टूर विजेतेपद

Asmita Chaliha Korea Masters 2026: अश्मिता चालिहाने पहिला गेम गमावल्यानंतर दमदार कमबॅक करत चीनच्या हान कियान शीचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. दुखापतीनंतर कोर्टवर परतलेल्या अश्मिताने कारकिर्दीतील पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं.
Korea Masters 2026

Korea Masters 2026

esakal

Updated on

Asmita Chaliha Korea Masters 2026: भारतीय बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहाने कोरिया मास्टर्स २०२६मध्ये मोठी कामगिरी केली आहे. आसामच्या २६ वर्षीय अश्मिताने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या चौथ्या मानांकित हान कियान शीचा पराभव करत आपल्या कारकिर्दीतील पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं.

रविवारी (९ ऑगस्ट) दक्षिण कोरियातील आसन येथे झालेल्या अंतिम सामन्यात अश्मिताची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. तिला पहिलाच गेम १४-२१ असा गमवावा लागला. पण त्यानंतर अश्मिताने जबरदस्त कमबॅक केलं. पुढचे दोन्ही गेम तिने २१-१४, २१-१४ असे जिंकत सामना आपल्या नावावर केला. तब्बल ५३ मिनिटे चाललेल्या या सामन्यात अश्मिताने दबावाच्या परिस्थितीतही संयम सोडला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com