
मकाऊ : भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेन व उदयोन्मुख खेळाडू तरुण मानेपल्ली यांनी मकाऊ ओपन सुपर ३०० या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीची उपांत्य फेरी गाठली. सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या भारतीय जोडीला मात्र पुरुषांच्या दुहेरीत हार पत्करावी लागली.