Denmark Open Super 750 : लक्ष्य सेनने भारताच्याच प्रणॉयचा पराभव करत गाठली उपांत्यपूर्व फेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lakshya Sen enmark Open Super 750 Badminton

Denmark Open Super 750 : लक्ष्य सेनने भारताच्याच प्रणॉयचा पराभव करत गाठली उपांत्यपूर्व फेरी

Lakshya Sen Denmark Open Super 750 : राष्टकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या लक्ष्य सेनने भारताच्याच वरिष्ठ सहकाऱ्याचा, एचएस प्रणॉयचा सरळ गेममध्ये पराभव करत डेन्मार्क ओपन सुपर 750 पुरूष एकेरीच्या उंत्यपूर्व फेरीत धडक मारली. ओडेनसे येथे सुरू असलेल्या डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेल्या लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत 13 व्या स्थानावर असलेल्या प्रणॉयचा 21 - 9, 21 - 18 असा पराभव केला.

हेही वाचा: IND vs PAK : सामन्यापूर्वीच पंतने पाकिस्तानी गोलंदाज हसन अलीला जागा दाखवून दिली

विशेष म्हणजे लक्ष्य सेनने 39 मिनिटात प्रणॉयला मात दिली. आतापर्यंत प्रणॉय आणि लक्ष्य सेनमधील लढतीत दोघांनी 2 - 2 सामने जिंकून बरोबरी साधली. मात्र आजच्या सामन्यात युवा सेनने प्रणॉयपेक्षा सरस खेळ केला. जागतिक क्रमवारीत 8 व्या स्थानावर असलेल्या सेनने पहिल्या गेममध्ये 5 - 1 अशी मोठी आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी 11 - 3 अशी वाढवली. मिड ब्रेकनंतर लक्ष्यने पहिला गे जिंकण्याच्या दिशेने कूच केली. सेनने पहिला गेम 21 - 9 असा जिंकला.

हेही वाचा: Wasim Akram : पाकिस्तानचा माजी कर्णधार म्हणतो, जय शहा एक फोन करायचा होता...

दुसऱ्या गेममध्ये अनुभवी प्रणॉयने झुंजार खेळ करत लक्ष्य सेनला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. त्याने 5 - 4 अशी आघाडी घेत गेमची सुरूवात केली. त्यानंतर प्रणॉय आणि लक्ष्यची अटीतटीची लढत 11 - 10 अशा स्थितीत पोहचली. हा अटीतटीचा गेम 17 - 17 असा बरोबरीत पोहचला होता. मात्र इथून लक्ष्य सेनने गेमवर आपली पकड मजबूत करत प्रणॉयचे परतीचे दोर कापले. सेनने दुसरा गेम 21 - 18 असा जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडत मारली.

टॅग्स :BadmintonBadminton court