Japan Open : लक्ष्य सेनची उपांत्य फेरीत धडक; सात्विक-चिराग यांच्यासह प्रणोयचाही पराभव

जपान ओपन; विजयासह लक्ष्य सेनने आपल्या सलग तिसऱ्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली
lakshya sen enters semifinals japan open satwiksairaj rankireddy chirag shetty bow out indian results
lakshya sen enters semifinals japan open satwiksairaj rankireddy chirag shetty bow out indian resultsSakal

टोकियो : पुरुष एकेरीतील भारताचे आशास्थान असलेल्या लक्ष्य सेनने जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. इतरांना आज पराभव स्वीकारावा लागल्यामुळे स्पर्धेत आव्हान कायम राहिलेला लक्ष्य सेन हा एकमेव भारतीय आहे.

पुरुषांच्या दुहेरीत सात्विकराज-चिराग शेट्टी यांनी सलग १२ सामन्यांच्या विजयाची मालिका संपुष्टात आणली, तर एच.एस प्रणोय कडव्या लढतीनंतर बलाढ्य एक्सल्सेनकडून पराभूत झाला. जागतिक क्रमवारीत सध्या १३ व्या स्थानावर असलेल्या लक्ष्य सेनने जपानच्या कोकी वातानाबेवर २१-१५, २१-१९ असा विजय मिळवला.

या विजयासह लक्ष्य सेनने आपल्या सलग तिसऱ्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. कॅनडा आणि अमेरिकेतील स्पर्धेनंतर त्याची ही प्रगती कायम आहे. उपांत्य सामन्यात लक्ष्यचा सामना इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्टी याच्याशी होणार आहे.

लक्ष्यसह अंतिम चार खेळाडूंत स्थान मिळवण्याची संधी प्रणोयला मिळाली होती, पहिला गेम जिंकून त्याने आशावाद निर्माण केला होता; परंतु जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सल्सेनविरुद्ध प्रणोयचा २१-१९, १८-२१, ८-२१ असा पराभव केला.

आजच्या दिवशी भारताला आणखी एक धक्का बसला. सध्या विजयी अश्वावर स्वार असलेल्या सात्विकराज आणि चिराग यांना ऑलिंपिक विजेत्या ली यंग आणि वँग ची लॅन यांच्याकडून कडव्या संघर्षानंतर १५-२१, २५-२३, १६-२१ अशी हार स्वीकारावी लागली.

समोर यजमान देशाचा खेळाडू असला आणि त्याला पाठिंबा अधिक असला तरी लक्ष्यने कोकीविरुद्ध शानदार सुरुवात करत ५-३, ११-७ अशी आघाडी घेतली. कोकीच्या खेळावर वर्चस्व मिळवण्यास लक्ष्यला फार प्रयत्न करावे लागले नाहीत आणि पहिला गेम सहज जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये बाजू अदलाबदल झाल्यावर कोकीने आपल्या खेळातला वेग वाढवण्याचा प्रयत्न केला; परंतु सामन्यावर नियंत्रण मिळवलेल्या लक्ष्यने ३-२ आघाडी घेतली. त्यानंतरची एक रॅली ४३ शॉटची झाली. यावेळी लक्ष्यचा फटका नेटमध्ये गेला आणि कोकीला डोके वर काढण्याची संधी मिळाली.

त्याने ५-३, ७-३ अशी आघाडी घेतली. सोबत त्याने आपला बचावही भक्कम करण्याचा प्रयत्न केला आणि १४-७ अशी आघाडी घेतली, पण येथूनच लक्ष्यने उलटवार करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता १८-१७ अशी आघाडी घेतली.

दोन शानदार रिर्टनचे फटके, बॅकहँडचे अचूक फटके मारत लक्ष्यने विजयावर शिक्कामोर्तब केले. एक्सल्सेन आणि प्रणोय यांच्यातील सामना प्रेक्षकांसाठी पर्वणी होता. दोघांमध्ये कमालीच्या रॅलीज झाल्या. एकमेकांविरुद्धच्या गेल्या तीन सामन्यांत प्रणोयने एक्सल्सेनवर दोनदा मात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com