Asian Badminton Championship: लक्ष्य सेनचा सलामीलाच धक्कादायक पराभव आशियाई बॅडमिंटन स्पर्धा; आयुष शेट्टीचा रोमहर्षक विजय

Shock Exit for Lakshya Sen in Opening Round: आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनचा धक्कादायक पराभव, तर आयुष शेट्टी आणि पी. व्ही. सिंधू यांनी शानदार विजय मिळवला. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा सविस्तर आढावा.
Asian Badminton Championship

Asian Badminton Championship

sakal

Updated on

निंगबो (चीन) : भारतीय खेळाडूंना आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील बुधवारच्या दिवशी संमिश्र यशाचा सामना करावा लागला. एकीकडे एच. एस. प्रणोय, आयुष शेट्टी व पी. व्ही. सिंधू यांनी एकेरी गटात विजय मिळवत पुढे पाऊल टाकले असताना दुसरीकडे मात्र लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, तन्वी शर्मा, मालविक बनसोड या खेळाडूंना एकेरी गटातच पराभवाचा सामना करावा लागला. दुहेरी विभागातही भारतीय खेळाडूंकडून निराशा झाली. के. सिल्वम - एस. सिंघी व ए. भट - एस. गौतम या दोन्ही जोड्यांचा पराभव झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com