BCCI झीरो होती; लता दीदींनी वर्ल्ड कप हिरोंसाठी केली लाख मोलाची मदत | Lata Mangeshkar Helped Indian Cricket Team | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lata Mangeshkar helped indian cricket team and bcci by concert in igi stadium delhi for money to 1983 world cup champion

BCCI झीरो होती; लता दीदींनी वर्ल्ड कप हिरोंसाठी केली लाख मोलाची मदत

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे वृद्धापकाळानं निधन झाले. इंदौररमध्ये 28 सप्टेंबर 1929 रोजी त्यांचा जन्म झाला होता. लता दीदींचे क्रिकेटवरील प्रेम सर्वज्ञात आहे. भारतीय संघाने पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी लता दीदींनी खेळाडूंसाठी जे केले ती गोष्ट भारतीय क्रिकेट कधीच विसरणार नाही. या घटनेमुळं लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि बीसीसीआयमध्ये या घटनेमुळे (BCCI) एक अनोख नातं निर्माण झालं. बीसीसीआयने लता मंगेशकर यांच्यासाठी नेहमी एक सीट राखीव घेण्याचा निर्णय घेतला होता. (Lata mangeshkar helped bcci in tough time bcci always keeps seat vacant as respect)

भारतीय संघाने कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली 1983 मध्ये पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकला होता. या विजयाने भारतीय क्रिकेटला कलाटणी मिळाली. पण त्यावेळी बीसीसीआयची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती. क्रिकेट जगतात गाजावाजा असलेल्या वेस्ट इंडीजला शह देऊन इतिहास रचणाऱ्या भारतीय शिलेदारांना बक्षीस देण्यासाठी बीसीसीआयकडे पैसा नव्हता.

राजसिंह डुंगरपुरकर यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी खेळाडूंना बक्षीसाची रक्कम देता यावी यासाठी लता मंगेशकर यांना चॅरिटी शो करायची विनंती केली. क्रिकेटच्या चाहत्या असणाऱ्या लता दीदींनी हा प्रस्ताव लगेच मान्य केला.

17 ऑगस्ट 1983 रोजी दिल्लीच्या इंदप्रस्थ स्टेडिअमवर लता मंगेशकर यांचा खास शो पार पडला. या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली होती. या कार्यक्रमातून बीसीसीआयकडे मोठी रक्कम जमा झाली. या कार्यक्रमात जवळपास 20 लाख रुपये जमा झाले होते. त्यामुळे बीसीसीआयला खेळाडूंना प्रत्येकी 1-1 लाख रुपयांचे बक्षीस देणं शक्य झालं. या कार्यक्रमासाठी लता मंगेशकर यांनी एक रुपायाही घेतला नव्हता.

Web Title: Lata Mangeshkar Helped Indian Cricket Team And Bcci By Concert In Igi Stadium Delhi For Money To 1983 World Cup Champion

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top