WTC Point Table : कांगारुंचे इंग्लंडला फटके, टीम इंडियाला बसले चटके

Australia
Australiaesakal

ब्रिसबेन : ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेत (Ashes Series) गाबा कसोटीत इंग्लंडचा (England) 9 विकेट्सनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने (Australia) पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेत पहिली कसोटी जिंकून 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताला चांगलाच फटका बसला आहे. आयसीसीच्या (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये (WTC Points Table) ऑस्ट्रेलियाच्या एका विजयाने मोठी उलाथापालथ झाली आहे. Latest ICC World Test Championship 2021-23 points table Australia reach 2 spot india on 4th )

Australia
Ashes|AUSvsENG : लायनकडून लायन्सचीच शिकार; कांगारुंची विजयी सुरुवात

ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 - 23 ( World Test Championship) मधील ही पहिलीच कसोटी होती. त्यांनी इंग्लंडचा पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 12 गुण मिळवले. त्यांची जिंकण्याची टक्केवारी 100 टक्के आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अजूनही श्रीलंका 24 गुण आणि जिंकण्याची टक्केवारी 100 टक्के राखत पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पाकिस्तान ( Pakistan) तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचे 36 गुण झाले आहेत. त्यांनी 2 कसोटी मालिकांमध्ये 4 कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील 3 सामने जिंकले आहेत तर 1 कसोटी गमावली आहे. पाकिस्तानची जिंकण्याची टक्केवारी 75 टक्के आहे. तर भारत आता गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने गाबा कसोटी जिंकण्यापूर्वी भारत (India) तिसऱ्या स्थानावर होता. आता तो एक पायरी खाली आला आहे.

Australia
Ashes : भारताने जे करुन दाखवले ते इंग्लंडला जमलेच नाही!

टीम इंडियाने (Team India) आतापर्यंत 2 कोसटी मालिका खेळल्या आहेत. त्यात 5 कोसटी सामन्यात भारताने 3 कसोटी सामने जिंकले आहेत तर एका कसोटीत भारताला पराभव सहन करावा लागला होता. भारताची जिंकण्याची टक्केवारी 58.33 टक्के इतकी आहे. आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत ( India Tour Of South Africa) कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे अॅशेस आणि भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बरेच बदल होतील.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सामना जिंकणाऱ्या संघाला 12 गुण मिळतात. सामना टाय झाला तर 6 गुण आणि सामना ड्रॉ झाला तर संघाला 4 गुण मिळतात. तर पर्सेंटेज ऑफ पॉईंटमध्ये ( जिंकणाऱ्या संघाला 100, सामना टाय झाला तर 50 आणि सामना ड्रॉ झाला तर 33.33 गुण मिळातात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पर्सेंटेज ऑफ पाईंटच्या आधारेच संघाचे रँकिंग ठरवले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com