९० वर्षांपूर्वी साडी नेसणाऱ्या पोरीने विम्बल्डनमध्ये भारताचं नाव गाजवलेलं..| leela row dayal 1st indian woman to win a match at wimbledon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

leela row dayal 1st indian woman to win a match at wimbledon

९० वर्षांपूर्वी साडी नेसणाऱ्या पोरीने विम्बल्डनमध्ये भारताचं नाव गाजवलेलं..

विम्बल्डन सारख्या मोठ्या टेनिस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या ऐश्वर्या जाधव हीची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे. अभिनेत्यांपासून राजकारणी मंडळी ऐश्वर्या जाधवचा व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून तिचे कौतूक करताना दिसत आहेत. दरम्यान, विम्बल्डनमध्ये इतिहास रचणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला टेनिसपटूची चर्चाही रंगली आहे.(leela row dayal 1st indian woman to win a match at wimbledon)

1934 मध्ये विम्बल्डन चॅम्पियनशिप स्पर्धेत 23 वर्षांची 4'10" उंच भारतीय मुलगी लीला रो ग्लॅडी साउथवेलला तोंड देत होती. रोने अप्रतिम कामगिरी करत ग्लॅडी साउथवेलचा ४/६, १०/८, ६/२ असा पराभव करून इतिहास रचला. आणि ती भारतातील पहिली महिला टेनिसपटू ठरली जिने विम्बल्डनमध्ये सामना जिंकला.

हेही वाचा: जोकोविचने विम्बल्डन जिंकून फेडररला टाकले मागे; आता नदाल रडारवर

लीला रोचा जन्म 19 डिसेंबर 1911मध्ये मुंबईतील सुसंस्कृत कुटूंबात झाला. डॉ राघवेंद्र रो असे वडिलांचा नाव असून पंडिता क्षमा असे तिच्या आईचे नाव आहे. जी केवळ संस्कृत लेखक नसून टेनिस खेळण्यातही निष्णात होता. लीलाचे शिक्षण आईने घरूनच केले. लीला इंग्रजी, फ्रेंच आणि इटालियन भाषांमध्ये माहिर होती.

लीलाने आईकडून अनेक गोष्टी आत्मसात केल्या. त्यामुळे लीलाला लहानपणापासूनच संस्कृत, नृत्य आणि टेनिसची आवड निर्माण झाली. लीलाची आईही सुरुवातीपासून टेनिसशी जोडलेली होती. 1920 च्या दशकात, ती राजकुमारी अमृत कौर ज्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या पहिल्या आरोग्य मंत्री होत्या त्यांच्यासोबत टेनिस खेळत असत आणि या जोडीची भारतातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणना होते. 1930 च्या दशकात लीला आणि तिची आई क्षामा यांनी अनेक दुहेरी सामनेही एकत्र जिंकले.

हेही वाचा: राजकारण रोजचंच आहे पण...; संजय राऊतांनी शेअर केला व्हिडीओ

मात्र, यानंतर लीलासाठी विम्बल्डनचा प्रवास सोपा नव्हता. 1931 मध्ये ऑल इंडिया चॅम्पियन असूनही प्रवेश शुल्क न भरल्यामुळे ती विम्बल्डनमध्ये सहभागी होऊ शकली नाही. पण या वर्षी लीला रोचे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले. तिने 1931 च्या अखिल भारतीय चॅम्पियनशिपमध्ये लेना मॅककेनाचा सरळ सेटमध्ये पराभव करून महिला एकेरी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

यानंतर, 1934 मध्ये लीला रो यांना विम्बल्डनमध्ये ब्रिटिश भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आणि तिच्या पहिल्याच सामन्यात तिने ग्लॅडी साउथवेलचा सरळ सेटमध्ये ४/६, १०/८, ६/२ ने पराभव केला. या सामन्यासह लीला विम्बल्डन सामना जिंकणारी पहिली भारतीय महिला टेनिसपटू ठरली.

मात्र, पुढच्याच सामन्यात लीला फ्रान्सच्या इडा अॅडमॉफकडून पराभूत झाल्याने विम्बल्डनमधून बाहेर पडली. एवढेच नाही तर लीलाने अखिल भारतीय चॅम्पियनशिपमध्ये 1936 ते 1943 दरम्यान एकूण सहा महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.

1930 च्या दशकात शॉर्ट स्कर्ट टेनिस खेळायला सुरुवात

लीलाचा डावा हात कमकुवत असूनही ती एक यशस्वी टेनिसपटू म्हणून उदयास आली. तिची पॉवरफुल ड्राइव्ह, अचूक शॉट प्लेसमेंट आणि आक्रमक मानसिकता यामुळे तिला एक अप्रतिम स्टार बनवले.

1930 च्या दशकात, जेव्हा बहुतेक भारतीय महिला टेनिसपटू साडी नेसून टेनिस खेळत असत, तेव्हा केवळ लीलाच नाही तर तिची आई क्षमा यांनी शॉर्ट स्कर्ट घालून टेनिस खेळायला सुरुवात केली.

हेही वाचा: सुनील गावस्कर जन्मानंतर एका कोळिणीच्या घरी पोहोचले अन्...

आपल्या खेळामुळे त्याने दशकभर भारतीय टेनिसमध्ये स्वत:चे नाव कमावले. केवळ टेनिसमध्येच नाही तर लेखणीमध्येही लीलाने आपले नाव आजमावले. भरतनाट्यम आणि मणिपुरी यांसारख्या शास्त्रीय नृत्यांवर लीलाने संस्कृत आणि इंग्रजीमध्ये अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. यासोबतच तिने अनेक संस्कृत कविता आणि त्यांच्या आईने लिहिलेली नाटके रंगभूमीवर सादर केली. इतकेच नव्हे तर लीला व्हायोलिनदेखील वाजवायची. ज्याचे प्रशिक्षण तिने पॅरिसमध्ये घेतले.

लीलाचा 1943 मध्ये हरिश्वर दयाल यांच्याशी झाला, जे नागरी सेवेत कार्यरत होते आणि नंतर त्यांनी नेपाळमध्ये भारतीय राजदूत म्हणून काम केले.

हरिश्वर दयाल यांना गिर्यारोहणाची खूप आवड आणि हा छंदही लीलापर्यंत गेला. लीला आणि हरिश्वर यांनी अनेक पर्वतांवर गिर्यारोहण केले आणि लीला यांनी गिर्यारोहणावर अनेक लेखही लिहिले. लीला यांच्याकडे प्रतिभेची कमतरता नव्हती पण विम्बल्डनमधील तिचा सहभाग ही भारतातील अनेक तरुणांसाठी एक विशेष कामगिरी होती.

Web Title: Leela Row Dayal 1st Indian Woman To Win A Match At Wimbledon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..