Legends League Cricket : गंभीर - पठाण सोशल मीडियावर नाही तर मैदानात भिडणार; सामना लाईव्ह कुठं पहायचा?

Legends League Cricket Final
Legends League Cricket Final esakal

Legends League Cricket Final IC vs BHK : सोशल मीडियावर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण एकमेकांशी अनेक मुद्द्यांवरून भिडले आहेत. आता हे दोन माजी दिग्गज क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांविरूद्ध उभे ठाकणार आहे. लेंजंड्स लीग क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज (दि. 5) जयपूर येथे इंडिया कॅपिटल्स आणि भीलवाडा किंग्ज यांच्यात होणार आहे. इंडिया कॅपिटल्सचे नेतृत्व गौतम गंभीर (Gautam Gambhir) तर भीलवाडा किंग्जचे नेतृत्व इरफान पठाण (Irfan Pathan) करणार आहे. या सामन्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या

Legends League Cricket Final
Mohammed Shami : शमीचे नशीब उजळले? बुमराहच्या जागी मिळणार T20 World Cup मध्ये चान्स
  • सामना कधी होणार?

- लेजंड्स क्रिकेट लीगचा अंतिम सामना हा 5 ऑक्टोबर बुधवारी होणार आहे.

  • सामना कोठे होणार आहे?

- हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे.

  • सामना किती वाजता सुरू होईल?

- इंडिया कॅपिटल्स आणि भीलवाडा किंग्ज यांच्यातील फायनल ही सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.

  • सामना कुठं पहायचा?

- लेजंड्स लीग क्रिकेटचा अंतिम सामना हा भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित होणार आहे.

  • लेजंड्स लीगच्या फायनलंच लाईव्ह स्ट्रीमिंग होणार?

- हो लेजंड्स लीग फायनलचं लाईव्ह स्ट्रीमिंग हे हॉटस्टारवर होणार आहे.

Legends League Cricket Final
Ind Vs SA 3rd T20: एका बॉलमध्ये दोन खेळाडू आऊट तरीसुद्धा पडली नाही विकेट

इंडिया कॅपिटल्सचा संघ

गौतम गंभीर (कर्णधार), ड्वेन स्मिथ, हॅमिल्टन मसाकाद्जा, रॉस टेलर, दिनेश रामदीन, एश्ले नर्स, जॉन मूनी, लियाम प्लंकेट, मिशेल जॉन्सन, पंकज सिंह, प्रविण तांबे, पवन सुयाल, इश्वर पांडे, प्रविण गुप्ता, सोलोमन मायर, सोहेल शर्मा, दिशांत याज्ञनिक, असगर अफगाण, रजत भाटिया, रवी बोपारा, मशरफे मोर्तझा, जॅक कॅलिस, प्रोस्पर उत्सेया, फरवेज माहरूफ.

भीलवाडा किंग्जचा संघ

विलियम पोर्टरफिल्ड, मॉर्ने वॅन विक, शेन वॉट्सन, युसूफ पठाण, इरफान पठाण, राजेश बिश्नोई, जेसल करिया, माँटी पनेसर, फिदेल एडवर्ड्स, एस श्रीसंत, सुदीप त्यागी, निक कॉम्पटन, राहुल शर्मा, मॅट प्रायर, दिनेश साळुंखे, नमन ओझा, मयांक तेहलान, समित पटेल, तन्मय श्रीवास्तव, टीम ब्रेसनन, ओवॅस शाह, टीनो बेस्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com