
Commonwealth Games 2022 : ज्यूदो डबल धमाका! सुशिला देवीची रूपेरी तर विजय कुमारची कांस्य कमाई
Commonwealth Games 2022 : ज्यूदो महिला 48 किलो वजनी गटात भारताने रौप्य पदकाची कमाई केली आहे. भारताच्या लिकमोबाम सुशिला देवीचा दक्षिण आफ्रिकेच्या मिचेला व्हाईटबोईने अंतिम सामन्यात पराभव केला. सुशिला देवीने मॉरिशियसच्या मोरांडला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी भारताचे अजून एक पदक निश्चित झाले. सुशिला देवीने 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत देखील रौप्य पदक पटकावले होते. त्यामुळे तिची राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकांची संख्या आता 2 वर पोहचली आहे. दोन्ही वेळा तिने पदकाला रूपेरी झळाली दिली.
सुशिला देवी बरोबरच भारताने ज्यूदोमध्ये अजून एका पदकाची कमाई केली. पुरूष 60 किलो वजनी गटात भारताच्या विजय कुमार यादवने पेट्रॉस ख्रिस्तोडोऊलिडेसचा 10 - 0 असा पराभव करत कांस्य पदक पटकावले. यामुळे भारताची पदकसंख्या 8 वर पोहचली. आजच्या दिवसातील हे भारताचे दुसरे रौप्य पदक ठरले.
भारताने चौथ्या दिवशी आतापर्यंत आपली पदक संख्या 8 पर्यंत नेली आहे. त्यात 3 सुवर्ण 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकांचा समावेश आहे. या आठ पदकांपैकी सहा पदके ही वेटलिफ्टिंगमध्ये मिळाली आहेत. तर आज ज्यूदोने भारताच्या पदक तालिकेत रौप्य आणि कांस्य अशा दोन पदकांची भर टाकली.
Web Title: Likmabam Shushila Devi Won Silver Medal In Judo 48 Kg Women In Commonwealth Games 2022 Birmingham
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..