
विश्वविजेता लिओनेल मेस्सी आणि त्याचा अर्जेंटिना संघ १४ वर्षांनंतर पुन्हा भारतात येणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी हा संघ केरळ येथे प्रदर्शनीय सामना खेळणार आहे.
केरळचे क्रीडामंत्री व्ही. अब्दुरहिमन यांनी मेस्सी त्याच्या अर्जेंटिनासह कोचीमध्ये सामना खेळणार असल्याची घोषणा गेल्या नोव्हेंबर महिन्यात केली होती. मेस्सीच्या या भारत दौऱ्याची निश्चिती आज बुधवारी झाली. एचएसबीसी हे या सामन्याचे प्रायोजक असून देशात फुटबॉलला अधिक चालना मिळण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.