लिओनेल मेस्सी 'फिफा'चा सर्वोत्कृष्ट खेळाडू 

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची "फिफा'च्या वतीने वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. या पुरस्कारासाठी त्याची झालेली निवड ही आश्‍चर्यकारक ठरत असून, ला स्काला ऑपेरा हाऊस येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात क्रिस्तीआनो रोनाल्डो याची अनुपस्थिती जाणवत होती. 

मिलान : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची "फिफा'च्या वतीने वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. या पुरस्कारासाठी त्याची झालेली निवड ही आश्‍चर्यकारक ठरत असून, ला स्काला ऑपेरा हाऊस येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात क्रिस्तीआनो रोनाल्डो याची अनुपस्थिती जाणवत होती. 

या वर्षी "युईएफए'चा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार पटकाविणाऱ्या व्हर्जिल व्हॅन विक याच्यावर मात करून मेस्सीने हा पुरस्कारा पटकाविला. या दोघांसह या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलेला तिसरा खेळाडू रोनाल्डो या सोहळ्यास उपस्थित नव्हता. मात्र, त्याची मेस्सीसह "फिफा'च्या जागतिक संघात निवड करण्यात आली आहे. 

या सोहळ्यानंतर आता मेस्सी आणि व्हॅन विक हे दोघे प्रतिष्ठेच्या बॅलन डी ओर पुरस्काराच्या शर्यतीत असतील. या पुरस्काराची घोषणा 2 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. 

"फिफा'च्या वतीने 2016 पासून प्रथमच या पुरस्काराची सुरवात करण्यात आली. तेव्हापासून मेस्सी प्रथमच या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. पहिली दोन वर्षे रोनाल्डो या पुरस्काराचा मानकरी ठरला होता. गेल्यावर्षी क्रोएशियाच्या लुका मॉर्डिचने या दोघांना मागे टाकत हा मान मिळविला होता. 

महिला विभागात हा पुरस्ताक महिला विश्‍वकरंडक र्स्धेत सहा गोल करणारी आणि सुवर्ण बुटाची मानकरी ठरलेली मेगन रॅपिनोए हिने पटकावला. 
 
असे आहेत अन्य पुरस्कार 
जुर्गन क्‍लॉप : सर्वोत्कृष्ट पुरुष प्रशिक्षक 
ऍलिसन बेकर : सर्वोत्कृष्ट गोलरक्षक 
जिल एलिस : सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षक 
"फिफा' फेअर प्ले : मार्सेलो बिएस्ला आणि लीड्‌स युनायटेड 

फिफा संघ : गोलरक्षक : ऍलिसन बेकर, बचावपटू : मार्सेलो, व्हर्जिल व्हॅन विक, मथायस डीलाईट, सर्गिओ रामोस, मध्यरक्षक : फ्रॅकनिक डी जोंग, लुका मॉर्डिच, कोएन हझार्ड, आक्रमक : किलियन एम्बाम्पे, क्रिस्तिआनो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी 

ज्यांनी माझी निवड केली त्यांचा मी आभारी आहे. पुरस्कार स्विकारणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आजची रात्र माझ्यासाटी खास असेल. 
-लिओनेल मेस्सी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lionel Messi was declared as a FIFA best Player