सुनील गावसकर 70 वय... काहीतरीच काय

सुनंदन लेले
Wednesday, 10 July 2019

भारत आणि न्यूझीलंड सामन्यात पावसाचा व्यत्यय आला, तेव्हा सचिन तेंडुलकरने कॉमेंटरी बॉक्समधे बोलावले. नेमके त्यावेळी सुनील गावसकरही तिथे आले. मग सरांच्या वाढदिवसाचा विषय निघाला आणि सचिनने सरांबरोबर सेल्फी काढली.

मँचेस्टर : लिटील मास्टर म्हणून ज्यांची क्रिकेट जगतात ख्याती आहे, त्या सुनील गावसकरांचा आज 10 जुलैला 70वा वाढदिवस आहे.

भारत आणि न्यूझीलंड सामन्यात पावसाचा व्यत्यय आला, तेव्हा सचिन तेंडुलकरने कॉमेंटरी बॉक्समधे बोलावले. नेमके त्यावेळी सुनील गावसकरही तिथे आले. मग सरांच्या वाढदिवसाचा विषय निघाला आणि सचिनने सरांबरोबर सेल्फी काढली.

मग सचिन म्हणाला, ‘‘70...काहीतरीच काय... सर हे मिडियावाले तुम्ही 70चे झाल्याच्या बातम्या देत आहेत. मी अशा अफवांवर विश्वास ठेवत नाही. तुम्ही अजून किती उत्साही, तंदुरुस्त आणि आनंदी दिसता’’.

सचिन तेंडुलरकच्या बोलण्याने सुनील गावसकर मनापासून हसले. राखीव दिवशी ढग बाजूला सारून सूर्य महाराज ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर अवतरले. कारण ‘सनी’ गावसकरांचा वाढदिवस साजरा केला जात होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: little master Sunil Gavaskar 70th birthday