esakal | IND vs SL: भुवी-चाहरची कमाल, बॅटिंगच्या जोरावर जिंकून दिली मॅच
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs SL

IND vs SL: भुवी-चाहरची कमाल, बॅटिंगच्या जोरावर जिंकून दिली मॅच

sakal_logo
By
सुशांत जाधव

Live Cricket Score, IND vs SL 2nd ODI : दीपक चाहर आणि उप-कर्णधार भुवनेश्वर कुमारने दमदार अर्धशतकी भागीदारी करत संघाला दुसरा विजय मिळवून दिली. दुसऱ्या वनडे सामन्यातील विजयासह शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका 2-0 असा खिशात घातलीये. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. तो माघारी फिरल्यानंतर भारतीय संघ पुन्हा अडचणीत सापडला होता. पण दीपक चाहर आणि भुवीने आठव्या विकेटसाठी 84 चेंडूत 84 धावांची भागीदारी करत संघाला विजय नोंदवून दिला.

सलामीवीर अविष्का फर्नांनडो 50 (71) आणि मध्यफळीतील असलंकाच्या 65 (68) धावांच्या जोरावर दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंका संघाने निर्धारित 50 षटकात 9 बाद 276 धावा केल्या होत्या. भारतीय संघाने 3 विकेट आणि 5 चेंडू राखून हे आव्हान पार केले. गोलंदाजीमध्ये दोन विकेट घेणाऱ्या दीपक चाहरने मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघानं दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर आता दुसरा वनडे सामना जिंकत भारतीय संघाने मालिका खिशात घातली आहे.

193-7 : 54 चेंडूत 35 धावांची खेळी करणाऱ्या कृणाल पांड्याला हंसरंगाने दाखवला तंबूचा रस्ता

160-6 : सूर्यकुमारने भारताकडून सर्वाधिक 53 धावांची खेळी केली, संनदाकन याने त्याची विकेट घेतली

116-5 : शनाकाने हार्दिक पांड्याला खातेही उघडू दिले नाही

115-4 : 37 धावांची भर घालून मनिष पांडेही फिरला माघारी, शनाकाने त्याला रन आउट केलं

65-3 : कर्णधार शिखर धवन पडझटीतून संघाला सावरतोय असे चित्र दिसत असताना हंसरंगाने त्याच्या इनिंगला लावला ब्रेक, धवनने 38 चेंडूत 29 धावा केल्या

39-2 : युवा ईशान किशनला रंजिथानं केलं बाद, त्याला अवघी एक धाव करता आली

28-1 : पृथ्वी शॉच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का, हंसरंगाच्या गोलंदाजीवर 13 धावांची भर घालून तो तंबूत परतला

निर्धारित 50 षटकात श्रीलंका 9 बाद 275 धावा

266-9 : ईशान किशनने संदकनाला केल रन आउट, त्याला खातेही उघडता आले नाही

264-8 : चमिरा 2 धावा करुन बाद, भुवीला मिळाले तिसरे यश

244-7 : भुवनेश्वर कुमारने असलंका 65 (68) याला बाद करत संघाला सातवे यश मिळवून दिले.

194-6 : चाहरला दुसरे यश, हंसरंगा 8 धावांवर तंबूत परतला

172-5 : दूसन शनाका 16 धावा करुन माघारी, चहलनं घेतली फिरकी

134-4 : दीपक चाहरने धनंजया डी सिल्वाला दाखवला तंबूचा रस्ता, त्याने 32 धावांची भर घातली

124-3 : भुवीने अविष्काच्या खेळीला लावला ब्रेक, त्याने 71 चेंडूत 50 धावा केल्या

श्रीलंकन सलामीवीर अविष्काची अर्धशतकी खेळी

77-2 : चहलने भानूका राजपक्षाला खातेही उघडू दिले नाही

77-1 : चहलने टीम इंडियाला मिळवून दिले पहिले यश, भानुका 42 चेंडूत 36 धावा करणाऱ्या मिनोद भानुकाचा मनिष पांडेन घेतला कॅच

श्रीलंकेची सावध सुरुवात, 4 षटकात बिनबाद 20 धावा

श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात एकही बदल करण्यात आला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यातील संघ कायम ठेवण्यात आला आहे.

कुठे पाहाल सामना?

भारत आणि श्रीलंकेदरम्यान खेळला जाणारा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर पाहू शकणार आहात. सोनी लिव्ह अॅप आणि संकेतस्थळावरही सामना पाहू शकता.

loading image