
Brij Bhushan Sharan Singh Son Karan : भाजप नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचा माजी अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंह हा कैसरगंज लोकसभा मतदार संघातून 2009 पासून निवडून येतोय. मात्र यंदा महिला कुस्तीपटूंनी त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर ब्रिजभूषण यांचं भाजपनं तिकीट कापलं. त्याच्या ऐवजी भाजपनं तिकीट घरातच राहील याची तजवीज केली. त्यांनी ब्रिजभूषणच्या मुलाला करण सिंहला तिकीट दिलं.
सध्या करण हा कैसरगंज मतदार संघातून 1 लाख 46 हजार 621 मतांनी आघाडीवर आहे. त्याने 5 लाख 60 हजार 672 मते मिळवली आहेत. त्यानं आपल्या वडिलांचा गड राखण्याचं काम केलं आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार समाजवादी पार्टीचे भगत राम यांना 4 लाख 14 हजार 051 मते पडली आहेत. ही आकडेवारी संध्याकाळी 4.20 वाजताची आहे.
भाजपने करणला तिकीट देण्यामागे या मतदार संघातील जाट मतदान आपल्या बाजूने खेचण्याची रणनिती आखली होती. करण हा 1990 साली जन्मला असून तो ब्रिज भूषणचा छोटा मुलगा आहे. त्याच्याकडे लॉ ची डिग्री असून तो ऑस्ट्रेलियात बिजनेस मॅनेजमेंटचा कोर्स देखील करतोय. याचबरोबर तो डबल ट्रॅपमधील राष्ट्रीय स्तरावरील शूटर देखील आहे.
करणने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेश कुस्ती महासंघाचे अध्यक्षपदाची धुरा देखील आपल्या खांद्यावर घेतली आहे. यापूर्वी ब्रिजभूषण उत्तर प्रदेश कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.