

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह गेल्या काही दिवसात महिला पैलवानांच्या लैगिंक छळाचा आरोपामुळे चर्चेत आले आहेत. आता पुन्हा एकदा पैलवानांच्या लैगिंक छळाचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. अशातच ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत त्याच कारण म्हणजे लोकसभा निवडणूक.
भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचे तिकीट रद्द केल्याच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
राजधानी लखनौपासून जवळ असलेल्या बाराबंकी येथे एका कार्यक्रमादरम्यान एका पत्रकाराने भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी त्यांचं तिकीट कापणार असल्याच्या चर्चेवर प्रश्न विचारले असता ते म्हणाले - 'माझं तिकीट कोण कापतंय... तुम्ही रद्द कराल का?' असा उलट प्रश्न बृजभूषण शरण सिंह यांनी केला आहे. तर पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येईल, असा विश्वास ब्रिजभूषण सिंह यांनी व्यक्त केला.
भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह बाराबंकी येथील केडी सिंह बाबू स्टेडियममध्ये पोहोचले होते, तिथे पत्रकारांनी त्यांना लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारले. सोशल मीडियावर चर्चा होत असल्याने तुमचे तिकीट कापले जात आहे का, असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह संतापले आणि माझे तिकीट कोण कापणार? फक्त नाव सांगा, असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर एका अल्पवयीन कुस्तीपटूने लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.या प्रकरणावर कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतरवर अनेक दिवस जोरदार आंदोलन केले आहे. या आंदोलनात ऑलिम्पिक पदके जिंकणारे खेळाडूही सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.