Look Back 2023 : सरत्या वर्षात सर्वात जास्त कष्ट ऑस्ट्रेलिया अन् न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी उपसले

2023 मध्ये सर्वाधिक षटके टाकणाऱ्या पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये किती फिरकीपटू?
Look Back 2023
Look Back 2023 esakal

Look Back 2023 : ऑस्ट्रेलिया संघासाठी सरते 2023 चे वर्ष हे चांगले होते. त्यांनी वर्षाच्या सुरूवातीला WTC ची फायनल जिंकली होती. त्यानंतर वर्ष संपत आलं असताना त्यांनी वनडे वर्ल्डकपवर सहाव्यांदा नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या या देदिप्यमान कामगिरीत गोलंदाजांचा वाटा मोठा आहे कर्णधार पॅट कमिन्सने तर यासाठी खूप कष्ट उपसले आहे.

म्हणूनच 2023 मध्ये सर्वाधिक षटके टाकणाऱ्यांच्या यादीत पॅट कमिन्स अव्वल स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज देखील या यादीत आपलं वरचं स्थान राखून आहे. विशेष म्हणजे 2023 मध्ये सर्वाधिक षटके टाकणाऱ्यांच्या यादीत पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये एकही फिरकीपटूचं नाव नाहीये. (Who Bowled Most overs in 2023)

Look Back 2023
Sharad Pawar : निर्णय घेण्यास उशीर केला... WFI च्या निलंबनानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने या वर्षी सर्वाधिक षटके टाकली आहेत. त्याने 389.4 षटके टाकली असून 49 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 7.9 षटकात एक विकेट घेतली आहे.

मॅट हेन्री

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 364.5 षटके गोलंदाजी करत 52 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला एक विकेट घ्यायला 7 षटके लागली.

टीम साऊदी

टीम साऊदीने 357.1 षटके टाकली असून तो 2023 मध्ये सर्वाधिक षटके टाकण्याऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 51 विकेट्स घेतल्या असून तो या यादीतील दुसरा न्यूझीलंडचा गोलंदाज आहे.

Look Back 2023
Champions Trophy 2025 : पाकिस्ताननं शस्त्र खाली ठेवलं... युएईवर सोपवण्यात येणार मोठी जबाबदारी?

मिचेल स्टार्क

मिचेल स्टार्कसाठी हे वर्ष एकदम खास आहे. मात्र हे वर्ष खास करण्यासाठी त्याला कष्टही तितकेच करावे लागले. त्याने वर्षभरात 245.1 षटके टाकली असून 59 विकेट्स घेतल्या आहेत.

जॉश हेजलवूड

जॉश हेजलवूड हा 2023 मध्ये सर्वाधिक षटके टकाणाऱ्यांच्या यादीतील पाचवा तर ऑस्ट्रेलियाचा तिसरा गोलंदाज आहे. त्याने 308.3 षटके टाकली आहेत. त्याने या वर्षी 49 विकेट्स घेतल्या आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com