Maharashtra Kesari : कोण आहे मानाची गदा मिळवणारा पृथ्वीराज पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पृथ्वीराज पाटील

Maharashtra Kesari : कोण आहे मानाची गदा मिळवणारा पृथ्वीराज पाटील

सातारा : कुस्ती मधील मानाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आज पार पडली आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील या पठ्यानं स्पर्धेची गदा आपल्या खांद्यावर घेतली आहे. कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि मुंबईचा विशाल बनकर यांच्यात हा अटीतटीचा सामना रंगला होता. या लढतीत पृथ्वीराजने ५-४ या फरकाने हा सामना जिंकला आहे.

अवघ्या २० वर्ष वयात महाराष्ट्र केसरीसारख्या मनाच्या स्पर्धेची गदा मिळवणारा तो एकमेव पहिलवान ठरला आहे. पृथ्वीराज पाटील हा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील देवठाण गावचा रहिवाशी असून तो अवघा वीस वर्षाचा पैलवान आहे. सध्या तो भारतीय सैन्य दलात हवालदार पदावर कार्यरत आहे. त्याचे संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण झालं आहे. तसेच मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा त्याने केला. तसेच कुस्ती खेळण्यासाठी त्याला महान भारत केसरी वस्ताद दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील आणि वस्ताद धनाजी पाटील यांच्याकडून धडे मिळाले आहेत.

हेही वाचा: Maharashtra Kesari : आर्मी मॅन पृथ्वीराजनं मारलं मैदान; उचलली मानाची गदा

त्याचं वजन सध्या ९५ किलो असून त्याच वजनाच्या गटातून त्याची स्पर्धा झाली आहे. तसेच तो ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदाचा मानकरी देखील आहे.

दरम्यान राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने साताऱ्यात जिल्हा तालीम संघाने ६४ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही साताऱ्याच्या जिल्हा क्रिडा संकुलात सुरु होती. दोन्हीही मल्ल तगडे असल्याने ही लढत अटीतटीची झाली. या लढतीत पृथ्वीराजनं बाजी मारत तब्बल २२ वर्षानंतर त्यांने कोल्हापूर जिल्ह्यासाठी हा मानाचा गदा मिळवून दिला आहे.

Web Title: Maharahstra Kesari 2022 Pruthviraj Patil Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Maharashtra Kesari