

मुंबई : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे व नागपूर या चार शहरांमध्ये बॅडमिंटन हा खेळ अग्रगण्य समजला जातो, पण आता या खेळाचा प्रसार व प्रचार महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात करावयाचा आहे, असे ध्येय महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे सचिव श्रीकांत वाड यांनी बाळगले आहे. दैनिक सकाळने याप्रसंगी त्यांच्याशी संवाद साधला.(Latest Sport News)
बॅडमिंटन या खेळाला ३१ जिल्ह्यांमध्ये रुजवायचे आहे. खेळाडूंच्या हिताच्या, मदत करणाऱ्या योजना अंमलात आणण्यात येणार आहेत. बॅडमिंटन स्पर्धांमध्ये दोन हजार स्पर्धकांचा सहभाग असतो. अशा वेळी या स्पर्धांच्या व्यवस्थापनावरही लक्ष देण्यात येणार आहे. पायाभूत सुविधा, स्पर्धेचे वेळापत्रक याकडे गांभीर्याने बघितले जाईल, असेही श्रीकांत वाड या वेळी म्हणाले.
विभागीय सेंटरसाठी प्रयत्न
स्पर्धांसाठी मोठे हॉल असावेत यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. विभागीय अत्याधुनिक सेंटर असायला हवेत. याकडेही लक्ष देण्यात येणार आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा विकास होईल, असा विश्वास पुढे त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.