

rohit pawar
esakal
मुंबई : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत घडलेल्या प्रकारामुळे राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात मोठी चर्चा सुरू आहे. भारताचा माजी क्रिकेट खेळाडू केदार जाधव याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली असून, मुंबई उच्च न्यायालयाने या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश जारी केले आहेत.