Sports News : महाराष्ट्र संघाची झुंज अपयशी,मध्य प्रदेशचा विजय; पृथ्वी, साहिल, अर्शीनची खेळी वाया

Syed Mushtaq Ali Trophy: पृथ्वी शॉ, साहिल पारख आणि अर्शीन कुलकर्णी यांच्या अर्धशतकांनंतरही महाराष्ट्राला मध्य प्रदेशविरुद्ध पाच धावांनी पराभव पत्करावा लागला.
Arshin Kulkarni remained unbeaten on 54, but Maharashtra fell five runs short against Madhya Pradesh.

Arshin Kulkarni remained unbeaten on 54, but Maharashtra fell five runs short against Madhya Pradesh.

esakal

Updated on: 

मोहाली, : महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाने मध्य प्रदेशकडून मिळालेल्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कडवी झुंज दिली. मात्र पृथ्वी शॉ (५१ धावा), साहिल पारख (५० धावा) आणि अर्शीन कुलकर्णी (नाबाद ५४ धावा) यांनी आक्रमक अर्धशतकी खेळी केल्यानंतरही महाराष्ट्राच्या संघाला पाच धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्राचा सय्यद मुश्ताक अली (राष्ट्रीय टी-२०) या स्पर्धेतील क गटामध्ये तिसरा पराभव झाला.

Loading content, please wait...