Asian Jr Athletics Championships : महाराष्ट्राच्या गौरव, प्राचीने गाठली आशियाई ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्रता

महाराष्ट्राच्या गौरव भोसले व प्राची देवकर यांनी शुक्रवारपासून लखनौ येथे सुरू झालेल्या ज्युनिअर फेडरेशन करंडक ॲथलेटिक्स स्पर्धेत तीन हजार मीटर शर्यतीत पात्रता निकष पार
Asian Junior Athletics Championships
Asian Junior Athletics ChampionshipsSakal

Nagpur News : महाराष्ट्राच्या गौरव भोसले व प्राची देवकर यांनी शुक्रवारपासून लखनौ येथे सुरू झालेल्या ज्युनिअर फेडरेशन करंडक ॲथलेटिक्स स्पर्धेत तीन हजार मीटर शर्यतीत पात्रता निकष पार करीत अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. पात्रता निकष पार केल्याने दोघांची दुबई येथे पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड पक्की मानली जात आहे.

मध्य रेल्वेत कार्यरत असलेले व शिवछत्रपती पुरस्कार विजेते भास्कर भोसले यांचा मुलगा असलेल्या गौरवने लखनौ येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सिंथेटिक ट्रॅकवर झालेल्या २० वर्षांखालील मुलांच्या तीन हजार मीटर शर्यतीत ८ मिनिटे ४०.१३ सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदक जिंकले.

या कामगिरीमुळे त्याने आशियाई ज्युनिअर स्पर्धेसाठी असलेली ९ मिनिटे १६.०० सेकंदाची पात्रताही पार केली. विशेष म्हणजे प्रथम सहा धावपटूंनी हे निकष पार केले. दोन वर्षांपूर्वी भोपाळ येथे झालेल्या युवा राष्ट्रीय स्पर्धेत तीन हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकल्यानंतरही त्याची आशियाई युवा ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड थोडक्यात हुकली होती.

मुलींच्या तीन हजार मीटर शर्यतीत सातारा जिल्ह्यातील असलेल्या प्राची देवकरने रौप्यपदक जिंकताना ९ मिनिटे ५३.७६ सेकंद अशी वेळ दिली. या शर्यतीत १० मिनिटे ००.६९ सेकंद अशी पात्रता होती. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत तिने १८ वर्षांखालील वयोगटात सुवर्णपदक जिंकले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com