
Maharashtra Kesari 2025: महाराष्ट्र केसरी २०२५ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात होणार आहे. माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात सामना रंगणार आहे. या लढतींमधील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबासाठी आज सामना होणार आहे. शिवराज की पृथ्वीराज आणि महेंद्र विरुद्ध साकेत यांच्यातील कोण महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकतो हे आज ठरणार आहे. चौघेही तुल्यबळ मल्ल असल्याने अंदाज वर्तविणे मुश्कील झाले आहे.