Maharashtra Kesari : प्रबळ दावेदार किरण भगत पहिल्याच फेरीत गारद

Maharashtra Kesari 2022
Maharashtra Kesari 2022Sakal

सातारा : महाराष्ट्र केसरी जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत याला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. साताऱ्याच्या घरच्या आखाड्यात खेळताना तो किताब जिंकेल, असा विश्वास स्थानिकांसह अनेक कुस्ती प्रेमींना होता. प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या साताऱ्याच्या किरण भगतला गोंदियाच्या वेताळ शेळकेनं पराभूत केले. अवघ्या एका गुणाने बाजी मारत वेताळ शेळकेनं विजयावर शिक्कामोर्तब केले. किरण भगतला 3 गुण मिळाले. तर वेताळ शेळकेनं 4 गुणांची कमाई करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

Maharashtra Kesari 2022
भारताच्या जावयाला कोहलीनं दिला बॅक मसाज; व्हिडिओ व्हायरल

2017 मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत साताऱ्याचा किरण भगत फायनलपर्यंत पोहचला होता. यावेळी त्याला पुण्याच्या अभिजित कटकेनं मात दिली होती. यावेळी तो घरच्या मैदानात पुन्हा आपल्यातील धमक दाखून देईल, असे वाटत होते. पण त्याच्यावर पहिल्याच फेरीत बाद होण्याची वेळ आलीये. अभिजित कटके विरुद्धच्या फायनल लढतीत 3 गुणांनी तो मानाची गदा उचलण्यास मुकला होता. आता एका गुणांनी पराभूत होऊन तो स्पर्धेच्या बाहेर पडला आहे.

Maharashtra Kesari 2022
किती गोड! रितिकाच्या कवेत डेल्फी; समायरा काढतेय फोटो

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित 64 वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब मैदान जिल्हा क्रीडा संकुलात सुरू आहे. संध्याकाळच्या सत्रात महाराष्ट्र केसरी फेरीला प्रारंभ झाला. माती विभागात साताऱ्याच्या किरण भगतकडे सर्वांच्या नजरा होत्या. किरणने सुरवातीलाच वेताळला कोंडी मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा प्रयत्न वेताळने निष्फळ ठरवला. सहा मिनिटांत त्याला तीन, तर वेताळने चार गुण मिळवले. गादी विभागात हर्षवर्धनने आदर्शला 8 विरूद्ध 2 गुणांच्या फरकाने पराभूत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com