
Shivraj Rakshe vs Prithviraj Mohol : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी विभागातील अंतिम लढतीमधील पंचाच्या चीतपटीच्या निर्णयावरून प्रचंड गदारोळ झाला होता. या निर्णयावर जनमानसातही उलटसुलट चर्चा झाल्या. यामुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने पाच सदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. ही समिती ‘महाराष्ट्र केसरी’ची गादी विभागातील शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील अंतिम लढतीची चौकशी करणार आहे.