

Pune News
esakal
अशोक निंबाळकर
वाघोली: कुस्तीपटूंसाठी महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब मानला जातो. आतापर्यंत राज्यात अर्धा शेकडा महाराष्ट्र केसरी झाले; परंतु अलीकडच्या काळात नरसिंग यादव वगळता एकाही केसरीचा ऑलिंपिकमध्ये डरकाळी शड्डू घुमलेला नाही. खाशाबा जाधव यांचा आदर्श असतानाही ऑलिंपिकच काय राष्ट्रकुल स्पर्धांमध्येही मराठी मल्लांच्या शड्डूचा आवाज घुमताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे.