

Sports News
esakal
वाघोली: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा तिसरा दिवस गाजवला तो नामवंत पृथ्वीराज मोहोळ, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन सदगीर, महेंद्र गायकवाड व शिवराज राक्षे यांनी. त्यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी विजय मिळवत घोडदौड कायम ठेवली. सिकंदर शेखनेही मैदान मारले. सुदर्शन कोतकरने चितपटीने विजय मिळवला.
गेल्या तीन दिवसांपासून येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू आहे. त्यात तब्बल पाच महाराष्ट्र केसरी मल्ल उतरले आहेत. त्यांनी आपापल्या लौकिकानुसार खेळ केला.