
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत मोठा वाद निर्माण झाला. अहमदनगरमधील अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत डबल महाराष्ट्र केसरी ठरलेला पैलवान शिवराज राक्षे आणि पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत शिवराज राक्षेचा पराभव झाला आणि त्यानंतर असलेल्या घटनांमुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला.