
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद: ब्रिजभूषण यांचा शरद पवारांना आणखी एक दणका
पुणे : ब्रिजभूषण सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आणखी एक दणका दिला आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी भारतीय कुस्ती संघाकडून एक अंतरिम समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद चालवण्यासाठी ही अंतरिम समिती काम करणार आहे.
अंतरिम समितीचे संचालक संजय कुमार सिंह, संयोजक- एस पी देशवाल, सदस्य- आदित्य प्रताप सिंह अशी ३ जणांची कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवारांना आणखी एक दणका बसला आहे.(Maharashtra Rajya Kustigir Parishad News)
शरद पवार हे अध्यक्ष असलेले महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय भारतीय कुस्ती संघाने घेतला आहे. महाराष्ट्र कुस्ती परिषदेने 15 ते 23 वयोगटाच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन यावर्षी केले नाही. त्यामुळे महासंघाने महाराष्ट्र कुस्ती परिषद ( Maharashtra Wrestling Council ) बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन निवडणूक तसेच दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी या समितीची निवड काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त केली होती. या परिषदेचे शरद पवार अध्यक्ष आहेत. भारतीय कुस्तीगीर महासंघाने ३० जून रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला होता. राज्य कुस्तीगीर संघटनेबाबत अनेक तक्रारी येत होत्या तसेच राष्ट्रीय महासंघाच्या अनेक प्रस्तवाकडे दुर्लक्ष करत असल्याने ही कारवाई केली गेली होती. (Sharad Pawar News)
महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आहेत. मात्र सचिव बाळासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभारामुळे भारतीय कुस्तीगीर महासंघाने हस्तक्षेप करत बरखास्तीची कारवाई केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा अंतरिम समितीची स्थापना करण्यात आली आहे.
Web Title: Maharashtra Rajya Kustigir Parishad Brijbhushan Sharan Singh And Sharad Pawar Maharashtra Wrestling Council
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..