

Shakuntala Khatavkar Dinkar Patil & Altaf Kadkale
Sakal
कबड्डीसाठी आयुष्य वेचणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ‘सकाळ’चे क्रीडा पत्रकार अलताफ कडकाले यांना उत्कृष्ट वार्तांकनासाठी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने २६ व्या कबड्डी दिनाचे औचित्य साधत विविध पुरस्कारांची घोषणा केली. कबड्डीसाठी योगदान देणारे खेळाडू, कार्यकर्ते, पंच, प्रशिक्षक, पत्रकार, तसेच उदयोन्मुख खेळाडूंच्या कार्यकर्तृत्वाचा या पुरस्कारांच्या माध्यमातून १५ जुलैला रत्नागिरी येथे गौरविले जाणार असल्याची माहिती संघटनेने पत्रकाद्वारे दिली.