

Maharashtra Kho-Kho Championship
sakal
बीड : राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत पुरुषांमध्ये पुणे, तर महिलांमध्ये धाराशिव विजेते ठरले. पुण्याने विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली, तर धाराशिवने सलग दुसऱ्या वर्षी राज्य अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. पुण्याचा शुभम थोरात आणि धाराशिवची अश्विनी शिंदे अष्टपैलू खेळाडू ठरले.