
Maharashtra Table Tennis Championship: राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष गटात चिन्मय सोमय्या (टीएसटी मुंबई) याने तर महिलांमध्ये सेनहोरा डीसूझा (मुंबई शहर) यांनी प्रथमच विजेतेपद पटकावले.
नाशिकच्या तनीषा कोटेचा हिने मुलींच्या १९ वर्षाखालील गटात सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावले तर मुलांमध्ये नाशिकच्याच कुशल चोपडा याने विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली
महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेने शिवछत्रपती क्रीडा नगरीतील वेटलिफ्टिंग सभागृहात आयोजित केली होती.