

Khelo India Tribal Games
ESakal
पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल स्पर्धेत महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी १ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदकांची लयलूट केली आहे. नागपूरच्या तन्वी धुर्वेने महाराष्ट्राच्या सुवर्ण पदकाचे खाते उघडले. तन्वीनंतर पलाश ठाकूरने पदकांचा डबल धमाका करत दिवस गाजविला. ट्रायबल स्पर्धेच्या पहिल्याच पर्वात महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमला. तन्वी धुर्वेने १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदक, तर १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्यपदक पटकावले.