
Maharashtra Won 201 medals in National Games 2025: महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गुजरात, गोवानंतर उत्तराखंड येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही पदकांची लयलूट केली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये ५४ सुवर्ण, ७१ रौप्य व ७६ ब्राँझ अशी एकूण २०१ पदकांची माळ आपल्या गळ्यात घातली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेतही २२८ पदकांची कमाई केली होती. याप्रसंगी सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या खेळाडूंना दोनशेच्यावर पदकांवर नाव कोरता आले आहे, हे विशेष. यंदाच्या स्पर्धेतील सर्वोत्तम राज्य विजेतेपदाचा मान महाराष्ट्रालाचा मिळाला.