Khelo India Wrestling : आयुषा, सुजयची सुवर्णपदकाला गवसणी; कुस्तीमध्ये दोन सुवर्ण, एक रौप्य, चार ब्राँझपदकांची कमाई
Wrestling Champions : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंनी सात पदकांची कमाई करत वर्चस्व प्रस्थापित केले. आयुषा गाडेकर व सुजय तनपुरे यांनी सुवर्णपदके पटकावत राज्याच्या यशात भर घातली.
पाटना (बिहार) : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील कुस्ती या खेळामध्ये सात पदकांवर मोहर उमटवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मराठमोळ्या कुस्तीगीरांनी दोन सुवर्णपदकांसह एकूण सात पदकांची लयलूट केली.