
सातारा : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या वयोवृद्ध खेळाडू तसेच किताब प्राप्त कुस्तीगिरांच्या मानधनात तब्बल १३ वर्षांनंतर वाढ झाली आहे. मानधनाची रक्कम सुमारे अडीचपट वाढविण्यात आली असून, या योजनेचा खेळाडूंना लाभ व्हावा, यासाठी खेळाडूंची यापूर्वीची कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाखावरून दोन लाख रुपये करण्यात आली आहे.