Ice Skating :'महाराष्ट्राच्या यश जामदारचा रौप्यपदकांचा दमदार चौकार'; राष्ट्रीय शॉर्ट ट्रॅक आइस स्केटिंग स्पर्धेत घवघवीत यश
Stellar Performance by Yash Jamdar: देशभरातील १९ राज्यांतील ७००हून अधिक राज्यस्तरीय विजेत्या खेळाडूंनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यशने महाराष्ट्र राज्य शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग स्पर्धेतील १३ ते १४ वयोगटातील ‘ज्युनियर सी’ गटात दोन रौप्यपदके जिंकून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
Ice Skating Glory: Yash Jamdar Brings Home Four Silver MedalsSakal
देहरादून (उत्तराखंड) : महाराष्ट्राच्या यश पारिजात जामदारने राष्ट्रीय आइस (स्पीड) स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेत संस्मरणीय कामगिरी केली. यश याने चार रौप्यपदकांवर नाव कोरत राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा झेंडा दिमाखात फडकवला.