INDvsSA : धोनी नाहीच; हार्दिकचे संघात पुनरागमन

वृत्तसंस्था
Thursday, 29 August 2019

वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत खेळलेल्या संघात एकमेव बदल करण्यात आला आहे.

मुंबई : पुढील महिन्यात मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन ट्‌वेन्टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून बहुचर्चित महेंद्रसिंह धोनीला स्थान देण्यात आले नाही. तर हार्दिक पंड्याने पुनरामगन केले आहे. 

निवड समितीचे काही सदस्य वेस्ट इंडीजमध्ये आहेत. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संघ निवड केली. वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत खेळलेल्या संघात एकमेव बदल करण्यात आला आहे. भुवनेश्‍वर कुमारला विश्रांती देऊन त्या ठिकाणी तंदुरुस्त झालेल्या हार्दिकची निवड करण्यात आली आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर हार्दिक पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. 

धोनीला संदेश? 
विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवड करतानाही धोनीबाबत चर्चा सुरू झाली होती, परंतु तो लष्कराच्या प्रशिक्षणासाठी सीमेवर गेला होता. त्यामुळे त्याचा विचार झाला नव्हता. आता तो परत आला आहे. मात्र, संघात निवड न झाल्यामुळे धोनीला निवड समितीने संदेश दिला असल्याचे बोलले जात आहे. 

भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahendra Singh Dhoni is not in Team India against South Africa Hardik Pandya return to into squad