VIDEO: 'मी असतो तर नक्की OUT...' LIVE मॅचमध्ये विराट कोहलीने अंपायरला लगावला टोला अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Main hota toh Out deta Virat jokes with umpire Nitin menon on umpires call

VIDEO: 'मी असतो तर नक्की OUT...' LIVE मॅचमध्ये विराट कोहलीने अंपायरला लगावला टोला अन्...

अहमदाबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी शानदार कसोट झळकावल्यानंतर विराट कोहली फॉर्ममध्ये आला आहे. मात्र, आज पाचव्या दिवशी विराट एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. त्याने लाईव्ह मॅचदरम्यान थेट अंपायरला खोचक टोमणा हाणला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ( Main hota toh Out deta Virat jokes with umpire Nitin menon on umpires call )

लाईव्ह मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

आज पाचव्यादिवशी विराट कोहलीने मैदानात फिल्डिंग करताना अंपायर नितीन मेनन यांना टोमणा मारला. नितीन मेनन यांनी अनेकदा विराट कोहलीला बाद केलं असल्याचे निर्दशनास आलय. हाच मुद्दा धरत विराटने मेनन यांना हसत उत्तर दिलं.

ऑस्ट्रेलिया इनिंगमध्ये 35 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. ट्रेविस हेड विरोधात एलबीडब्ल्यूच अपील झालं. त्यावर नितीन मेनन यांनी नॉटआऊट दिलं. टीम इंडियाने रिव्यू घेतला. थर्ड अंपायरने मैदानावरील अंपायरचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर विराट कोहलीने नितीन मेनन यांच्या निर्णयावर कमेंट केली. जी स्टंप माईकमध्ये कैद झाली.

नॉटआऊट देताच विराट म्हणाला, ‘मी असतो, तर आऊट दिलं असतं’. त्याच्या या कमेंट वर मेनन यांनी विराटला थम दाखवला.

यापूर्वी काय घडलं होतं...

बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या दुसऱ्या दिल्ली कसोटीत विराट कोहली वादग्रस्त पद्धतीने आऊट झाला होता. कुहनेमनच्या बॉलिंगवर विराट कोहलीला एलबीडब्ल्यू आऊट देण्यात आलं होतं.

विराट बाद देण्याचा निर्णय नितीन मेनन यांनी घेतला होता. विराट कोहलीने अंपायरच्या निर्णयाविरोधात डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये थर्ड अंपायर चेंडू पहिला बॅटवर लागला की, पॅडवर हे ठरवू शकले नाहीत.

देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

त्यानंतर थर्ड अंपायरने मैदानावरील पंच नितीन मेनन यांच्या निर्णयाच समर्थन केल. त्यामुळे विराट कोहलीला पॅव्हेलियनमध्ये परताव लागलं.

टॅग्स :Virat kohli