PV Sindhu Malaysia Masters 2023 : सिंधू, प्रणॉयची उपांत्य फेरीत धडक! श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

PV Sindhu
PV Sindhuesakal

Malaysia Masters 2023 : भारतीय खेळाडूंना मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये शुक्रवारी संमिश्र यशाचा सामना करावा लागला. एकीकडे पी. व्ही. सिंधू व एच. एस. प्रणॉय यांनी एकेरी गटात उपांत्य फेरीत प्रवेश करतानाच दुसरीकडे मात्र किदांबी श्रीकांत याचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.

PV Sindhu
Prithvi Shaw : 'क्रिकेटर कमी अन् MC Stanचीच...', पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंड सोबतच्या व्हिडिओवर चाहते भडकले

दुहेरी ऑलिंपिक पदकविजेती व सहावी मानांकित सिंधू हिने चीनच्या यी मॅन झँग हिचे कडवे आव्हान २१-१६, १३-२१, २२-२० असे १ तास व १४ मिनिटांमध्ये परतवून लावले आणि अंतिम चारमध्ये प्रवेश केला. पहिल्या गेममध्ये झँग हिच्याकडे सुरुवातीला ५-० अशी आघाडी होती. सिंधू मागे पडणार असे वाटत असतानाच तिने बॅडमिंटन कोर्टवर झोकात पुनरागमन केले आणि १०-१० अशी बरोबरी साधली. सिंधूने यानंतर मागे वळून बघितले नाही. अखेर पहिला गेम २१-१६ असा जिंकत सिंधूने १-० अशी आघाडी मिळवली.

PV Sindhu
Rohit Sharma IPL 2023: पराभवानंतर कर्णधार रोहित संघावर भडकला! कोणाच्या माथी फोडले खापर

दुसऱ्या गेममध्ये झँग हिने जबरदस्त पुनरागमन केले. सिंधू हिला पुढे जाण्याची संधीच दिली नाही. या गेममध्ये झँग हिचे वर्चस्व प्रकर्षाने दिसून आले. झँग हिने हा गेम २१-१३ असा जिंकत उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत १-१ अशी बरोबरी साधली. अपेक्षेप्रमाणे अखेरचा गेम अटीतटीचा झाला. दोन्ही खेळाडूंमध्ये १२-१२ अशा बरोबरीनंतर १७-१७ अशीही बरोबरी झाली. सिंधूने बाजी मारत २०-१७ अशी आघाडी मिळवली. पण झँगने हार न मानता २०-२० अशी बरोबरी साधली. सिंधूने दबावाखाली आपला खेळ उंचावला आणि २२-२० असा विजय साकारला. सिंधू आता उपांत्य फेरीच्या लढतीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया तुनजुंग हिचा सामना करील.

विजयासाठी झुंज

सिंधूप्रमाणेच एच. एस. प्रणॉय यालाही विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. प्रणॉयने जपानच्या केंटा निशिमोटो विरुद्धची ही लढत २५-२३, १८-२१, २१-१३ अशी १ तास व ३१ मिनिटांमध्ये जिंकली. पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये कमालीची चुरस दिसून आली. दोन्ही खेळाडूंमध्ये १२-१२, १७-१७, २०-२० अशी बरोबरी झाल्यानंतर प्रणॉय याने २५-२३ असे यश मिळवले आणि १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये ९-९ अशी बरोबरी झाली होती. पहिल्या गेमप्रमाणे याही गेममध्ये थरार दिसून येईल असे वाटू लागले. पण निशिमोटो याने १७-११ अशी आघाडी घेत प्रणॉयवरील दबाव वाढवला. प्रणॉयने ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश मिळाले नाही. निशिमोटो याने २१-१८ असा हा गेम जिंकला. अखेरच्या गेममध्ये प्रणॉयच्या झंझावातासमोर निशिमोटोचा निभाव लागला नाही. प्रणॉयने २१-१३ अशा दमदार यशासह अंतिम चारमध्ये धडक मारली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com