

Manas Dhamne
esakal
नवी दिल्ली : महाराष्ट्राचा १८ वर्षीय टेनिसपटू मानस धामणे याची भारतीय टेनिस संघामध्ये पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. डेव्हिस टेनिस करंडकातील दुसऱ्या पात्रता फेरीतील दक्षिण कोरियाविरुद्धच्या लढतीसाठी (१८ व १९ सप्टेंबर) भारतीय संघाची निवड करण्यात आली. यामध्ये मानस धामणे याला संधी देण्यात आली आहे.