Cristiano Ronaldo : रोनाल्डोला मँचेस्टर युनायटेडमधून मिळणार डच्चू; जाहीर मुलाखत भोवणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cristiano Ronaldo Manchester United Controversy

Cristiano Ronaldo : रोनाल्डोला मँचेस्टर युनायटेडमधून मिळणार डच्चू; जाहीर मुलाखत भोवणार?

Cristiano Ronaldo Manchester United Controversy : कतारमधील FIFA World Cup 2022 सुरू होण्यापूर्वीच पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोने वादग्रस्त मुलाखत घेत खळबळजनक विधाने केली होती. त्याने मँचेस्टर युनायटेडचे व्यवस्थापक एरिक टेन हॅग यांच्याविरूद्ध वादग्रस्त विधाने करून एकच खळबळ उडवून दिली होती. यानंतर आता मँचेस्टर युनायटेडने याबाबत कडक निर्णय घेण्याचे ठरवले असून, क्लब रोनाल्डोसोबचा करार संपवण्याबाबत विचार करत आहे.

हेही वाचा: Hardik Pandya : क्रोनोलॉजी! हार्दिकच्या राज्याभिषेकापूर्वीच चेतन शर्मांची गच्छंती

रोनाल्डोने ब्रिटीश पत्रकार मॉर्गन यांना दिलेल्या मुलाखतीत मँचेस्टर युनायटेडचे व्यवस्थापक एरिक यांच्याबद्दल कोणताही आदर नाही असे वक्तव्य केले होते. याचबरोबर त्याने क्लबमधील अधिकारी त्याला मँचेस्टर युनायटेडमधून जबरदस्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा देखील आरोप केला होता.

रोनाल्डोच्या या विधानांनंतर मँचेस्टर युनायटेडने रोनाल्डोवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. इंटरनेटवर रोनाल्डोची वक्तव्ये व्हायरल होत असताना क्लबने त्याला प्रत्युत्तर दिले की 'आता सर्व पुराव्यानिशी सिद्ध झाल्यानंतर आम्ही यावर योग्य ती कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.'

हेही वाचा: महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

स्काय सोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार रोनाल्डो आता पुन्हा एकदा मँचेस्टर युनायटेडच्या लाल जर्सीत दिसेल याची शक्याता जवळपास संपुष्टात आली आहे. मँचेस्टर युनायटेडने रोनाल्डोवर करवाई करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा दिलेली नाही. मात्र क्लबला रोनाल्डोची एक्झिट ही व्यवस्थित, सन्मानजनक आणि त्वरित करायची आहे. त्यांना रोनाल्डोला क्लब सोडण्यासाठी कोणतेही पैसे देऊ इच्छित नाहीत. मात्र रोनाल्डोचा करार हा इतिहासातील एक सर्वात मोठ्या करारापैकी एक आहे त्यामुळे ही गोष्ट दिसते तितकी सोपी नाही.