esakal | भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्राचा कोचवर गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Manika Waiting for prize of the Delhi Commonwealth Games

भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्राचा कोचवर गंभीर आरोप

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: भारताची स्टार टेबल टेनिसपटू (Table Tennis) मनिका बत्राने (Manika Batra) प्रशिक्षक सौम्यदीप रॉय (Soumyadeep Roy) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सौम्यदीप रॉय टेबल टेनिसचे राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. ऑलिंपिक (Olympics) पात्रता फेरीच्या एका सामन्यात सौम्यदीप रॉय यांनी त्यांच्या एका विद्यार्थिनीकडून मला पराभूत व्हायला सांगितले होते, असा गंभीर आरोप मनिका बत्राने केला आहे.

सौम्यदीप रॉय यांची मदत नाकारुन खेळाची प्रतिष्ठा कमी केल्याचा आरोप मनिकाने फेटाळून लावला. तिने टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला हे उत्तर दिले आहे. टीटीएफआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑलिंपिकच्या काही महिने आधी कोणी शेजारी बसून मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी व्हायला सांगत असेल, तर सामन्यावर आपण लक्ष केंद्रीत करु शकत नाही असे मनिकाने तिच्या उत्तरात म्हटले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: अनिल देशमुखांचा तपास अहवाल लीक करण्यासाठी सीबीआय अधिकाऱ्याला 'आयफोन'ची लाच

मनिका जागतिक क्रमवारीत ५६ व्या स्थानावर आहे. "मार्च २०२१ मध्ये दोहा येथे झालेल्या पात्रता फेरीच्या स्पर्धेत राष्ट्रीय प्रशिक्षकाने माझ्यावर त्यांच्या विद्यार्थिनीबरोबरचा सामना हरण्यासाठी दबाव टाकला. जेणेकरुन ती ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरेल, एक प्रकारचे हे मॅच फिक्सिंगच झाले" असं मनिकाने म्हटलं आहे. या आरोपांवर सौम्यदीप रॉय यांनी अजून उत्तर दिलेले नाही.

loading image
go to top