WTT Contender : जोडीदार बदलत मनिकाची जेतपदाला गवसणी

मनिका बत्रा मिश्र दुहेरीत साथियानसोबत फार कमी सामने खेळली आहे. ती नेहमी शरथ कमलच्या साथीने खेळताना पाहायला मिळाले आहे.
Manika Batra and G. Sathiyan
Manika Batra and G. SathiyanTwitter

ऑलिम्पिक स्पर्धेत असभ्य वर्तनामुळे वादात अडकलेल्या भारताच्या टेबल टेनिस स्टार मनिका बत्रा हिने जी साथियानच्या साथीनं WTT Contender स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्टमध्ये झालेल्या स्पर्धेतील मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या जोडीनं हंगेरीच्या डोरा आणि नंदौर या जोडीला 3-1 असा पराभव केला. शुक्रवारी झालेल्या फायनल लढतीत भारताच्या जोडीने 11-9, 9-11, 12-10 आणि11-6 असा विजय नोंदवत जेतेपदावर नाव कोरले.

मनिका बत्रा मिश्र दुहेरीत साथियानसोबत फार कमी सामने खेळली आहे. ती नेहमी शरथ कमलच्या साथीने खेळताना पाहायला मिळाले आहे. जपानमधील टोकियोत पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही ती शरथ कमलसोबतच खेळताना दिसली होती. ऑलिम्पिकमध्ये या जोडीला लक्षवेधी कामगिरी करण्यात अपयश आले. त्यानंतर मनिकाने साथियानसोबत खेळण्याचा निर्णय घेतला. या जोडीचा हा बदलाचा प्रयोग यशस्वी ठरला.

Manika Batra and G. Sathiyan
PKL 8 : मेगा लिलावापूर्वी स्टार खेळाडूंना नारळ!

ऑलिम्पिक स्पर्धेनंतर शिस्तभंग केल्याचा ठपका

ऑलिम्पिक स्पर्धेत मनिका बत्राने राष्ट्रीय कोच सौम्यदीप रॉय यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यास नकार दिला होता. कोचच्या मार्गदर्शनाशिवाय खेळताना तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तिच्या या भूमिकेवर टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) ने आक्षेप नोंदवला होता. तिच्यावर शिस्तभंग केल्याप्रकरणी नोटीसही बजावण्यात आली होती. ऑलिम्पिक स्पर्धेला मनिका वैयक्तिक कोच परांजपे यांच्यासह टोकियोला गेली होती. महिला एकेरीतील मुख्य सामन्यात तिच्या पर्सनल कोचला स्टेडियममध्ये एन्ट्री देण्यात आली नव्हती. याच रागातून तिने राष्ट्रीय संघाच्या कोचकडून मार्गदर्शन घेण्यास नकार दिला होता.

Manika Batra and G. Sathiyan
पुण्यातील स्टेडियमला दिलं जाणार 'गोल्डन बॉय' नीरजचं नाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com