Manolo Márquez : मारकेझ यांनी प्रशिक्षकपद सोडले; भारतीय फुटबॉल संघाच्या सुमार कामगिरीचे पडसाद
Indian football coach : भारतीय फुटबॉल संघाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमार कामगिरीमुळे मुख्य प्रशिक्षक मनोलो मारकेझ यांनी करार संपण्यापूर्वीच माघार घेतली आहे. एआयएफएफसोबत सल्लामसलत करून त्यांनी राजीनामा दिला.
नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल संघाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमार कामगिरीचा फटका मुख्य प्रशिक्षक मनोलो मारकेझ यांना बसला आहे. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेसह (एआयएफएफ) परस्पर संवाद साधत मनोलो मारकेझ यांनी प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला.