
Manu Bhaker Family Member Die in Accident : पॅरिस ऑलिम्पिकमधील पदक विजेती मनु भारकरला नुकतेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण आता मनु भाकरच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. रविवारी मनुच्या कुटुंबातील दोन सदस्यांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. चरखी दादरीमधील महेंद्रगड रोडवर हा अपघात झाला. ज्यामध्ये मनूच्या मामा व आजीला आपला जीव गमवावा लागला आहे.