esakal | भारतीय कुमारांकडून पॅलेस्टाईनचा सहज धुव्वा 
sakal

बोलून बातमी शोधा

Representational Image

भारतीय कुमारांकडून पॅलेस्टाईनचा सहज धुव्वा 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : भारतीय कुमारांनी आशियाई सोळा वर्षांखालील पात्रता फुटबॉल स्पर्धेत जोरदार सुरवात करताना पॅलेस्टाईनचा 3-0 असा पराभव केला. काठमांडू येथील हलचौक स्टेडियमवरील या लढतीत पूर्वार्धातील गोलशून्य बरोबरीनंतर भारतीयांनी उत्तरार्धात गोल करीत विजय साकारला. 

गिवसन सिंग मॉईरॅंगतथम याने 51 व्या मिनिटास भारताचे खाते उघडले. बेकेय ओरम याने 72 व्या मिनिटास आघाडी वाढवली आणि कर्णधार विक्रम प्रतापने 79 व्या मिनिटास गोल करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

भारतीयांनी पूर्वार्धातही हुकुमत राखली होती. आठव्या मिनिटास बेकेय गोल करण्यात थोडक्‍यात अपयशी ठरला. भारतीय आक्रमणात मोलाची कामगिरी बजावत असलेल्या गिवसनची जबरदस्त चाल पॅलेस्टाईन गोलरक्षकाच्या चपळाईने विफल ठरली. तीनच मिनिटांत हरप्रीतच्या किकवर चेंडू क्रॉसबारला लागून परत आला. गुरकीरतचा प्रयत्नही पॅलेस्टाईन गोलरक्षकाने हाणून पाडला. 

उत्तरार्धात भारतीय आक्रमणे जास्त सफाईदार होती. 51 व्या मिनिटास गिवसनने पॅलेस्टाईन गोलरक्षकाला चकवत खाते खोलले. 72 व्या मिनिटास रिकीच्या पासवर बेकेयने चेंडूस योग्य दिशा दिली. विक्रमच्या गोलने पॅलेस्टाईनला खच्ची केले. भारताची पुढील लढत शुक्रवारी (ता. 22) नेपाळविरुद्ध होईल.

loading image
go to top