esakal | 2019 वर्ल्ड कपपर्यंत धोनी खेळणार!
sakal

बोलून बातमी शोधा

File photo of MS Dhoni

2019 वर्ल्ड कपपर्यंत धोनी खेळणार!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मध्यंतरीच्या काळात आम्ही नवोदित यष्टिरक्षकांना विविध सामन्यांमध्ये संधी दिली; परंतु धोनीच्या जवळपासही कोणाला गुणवत्ता दाखवता आली नाही, असे मत निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी मांडले. त्यानुसार 2019 च्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेपर्यंत धोनीच प्रमुख यष्टिरक्षक राहाणार याचे संकेत मिळाले. 

मर्यादित षटकांच्या खेळात धोनीचा वारसदार म्हणून रिषभ पंतकडे पाहिले जात होते; परंतु निवड समितीच्या नजरेतून तो आता मागे पडला आहे, म्हणून त्यांनी 32 वर्षीय दिनेश कार्तिकची धोनीला सहायक म्हणून प्राधान्य दिले आहे. 

प्रत्येक मालिकेबरोबर धोनीच्या कामगिरीचा आढावा घेतला जात आहे का, या प्रश्‍नावर प्रसाद म्हणाले. भारत 'अ' संघातून आम्ही काही नवोदित यष्टिरक्षकांना तयार करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्या कामगिरीचे विश्‍लेषण केल्यानंतर विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत धोनीला कायम ठेवण्याचे विचार आम्ही पक्का केला आहे, त्यानंतर आम्ही पुन्हा नवोदितांना तयार करण्याचा प्रयत्न करू. 

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनी हा सध्याचा विश्‍वातील नंबर एकचा यष्टिरक्षक आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याचे सफाईदार आणि चपळ यष्टिरक्षण नजरेत भरणारे आहे, असे सांगून प्रसाद म्हणतात, धोनीशी कोणाबरोबर तुलना होऊ शकत नाही. त्याच्या जवळही जाणारे यष्टिरक्षण सध्या दिसत नाही. 

प्रसाद यांच्या या स्पष्ट वक्तव्यावरून इंग्लंडमध्ये 2019 मध्ये होणारा विश्‍वकरंडक धोनी खेळणार हे निश्‍चित झाले, त्यामुळे पर्यायाने त्याच्या निवृत्तीची चर्चाही बाजूला पडली. 

पंत आणि संजू सॅमसन यांना अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत, असे स्पष्ट मत मांडताना प्रसाद म्हणाले, जेवढी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून केली होती तेवढी प्रगती ते करू शकले नाहीत. भारत 'अ' संघातून आम्ही अजूनही त्यांना संधी देत आहोत, ते कधी प्रगल्भ होतात याची आम्हीही वाट पाहत आहोत.

loading image
go to top