Marlon Samuels banned : ICC ची मोठी कारवाई! 'या' वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूवर घातली ६ वर्षांची बंदी

Marlon Samuels banned from all cricket for six years for breaching anti-corruption code
Marlon Samuels banned from all cricket for six years for breaching anti-corruption codesakal

Marlon Samuels banned : भ्रष्टाचाराविरोधात मोठे पाऊल उचलत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू मार्लन सॅम्युअल्सवर सहा वर्षांची बंदी घातली आहे. सॅम्युअल्सला सहा वर्षांसाठी अमिराती क्रिकेट बोर्डाच्या (ECB) भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. आयसीसी एचआर आणि इंटिग्रिटी युनिटचे प्रमुख अॅलेक्स मार्शल यांनी गुरुवारी सॅम्युअल्सवरील बंदीची घोषणा केली.

Marlon Samuels banned from all cricket for six years for breaching anti-corruption code
Rahul Dravid: द्रविडनंतर कोण घेणार त्याची जागा ? या दिग्गज खेळाडूचं नाव शर्यतीत सर्वात पुढे

आयसीसी सांगितल्यानुसार, सॅम्युअल्सवरील ही बंदी 11 नोव्हेंबर 2023 पासून लागू होईल. सॅम्युअल्स चार गुन्ह्यांमध्ये दोषी आढळले. यामध्ये कलम 2.4.2, कलम 2.4.3, कलम 2.4.6, कलम 2.4.7 या अंतर्गत आरोप करण्यात आले.

आयसीसीच्या एचआर आणि इंटिग्रिटी युनिटचे प्रमुख अॅलेक्स मार्शल म्हणाले की, 'सॅम्युअल्सने जवळपास 20 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे, त्यादरम्यान त्याने अनेक भ्रष्टाचारविरोधी सत्रांमध्ये भाग घेतला आहे. आणि सेवानिवृत्त झाला असला तरी या गुन्ह्यांमध्ये तो सहभागी होता. सहा वर्षांच्या बंदीमुळे असा गुन्हा करण्याचा विचार करणाऱ्यांना कडक संदेश जाईल.

2012 आणि 2016 च्या टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये मार्लन सॅम्युअल्स वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. सॅम्युअल्स शेवटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट 2018 मध्ये खेळले होते. नोव्हेंबर 2020 मध्ये सॅम्युअल्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.

सॅम्युअल्सने 11,000 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. सॅम्युअल्सने वेस्ट इंडिजकडून 71 कसोटी, 207 एकदिवसीय आणि 67 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

सॅम्युअल्सने सात कसोटी आणि 10 एकदिवसीय शतके झळकावली आहेत. सॅम्युअल्स हा एक अष्टपैलू फलंदाज आहे, ज्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 41, 89 आणि 22 विकेट घेतल्या आहेत. सॅम्युअल्सने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 14 डिसेंबर 2018 रोजी बांगलादेशविरुद्ध खेळला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com