India vs New Zealand 1st T20I : गप्टिलसोबत चमकला नवा हिरो, टीम इंडियासमोर आव्हानात्मक लक्ष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ
India vs New Zealand 1st T20I : गप्टिलसोबत चमकला नवा हिरो, टीम इंडियासमोर आव्हानात्मक लक्ष्य

IND vs NZ 1st T20I : गप्टिलसोबत चमकला नवा हिरो

India vs New Zealand 1st T20I : जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात मार्टिन गप्टिसह न्यूझीलंडच्या नव्या हिरोची झलक पाहायला मिळाली. रोहित शर्मा टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भुवीने डॅरेल मिशेलला खातेही उघडू दिले नाही. न्यूझीलंडने अवघ्या एका धावेवर न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर गप्टिल आणि मार्क चॅपमन या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली.

मार्कने 50 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 63 धावांची खेळी केली. अश्विनने त्याच्या खेळीला ब्रेक लावला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या ग्लेन फिलिप्सला अश्विनने खातेही उघडू दिले नाही. स्फोटक फलंदाजी करणाऱ्या मार्टिन गप्टिलला दीपक चाहरने बाद केले. त्याने 42 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 70 धावांची खेळी केली. मार्टिन आणि मार्कशिवाय अन्य कोणलाही मोठी खेळी करता आली नाही. या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकात 6 बाद 164 धावा केल्या. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमार आणि अश्विन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. दीपक चाहर आणि मोहम्मद सिराजला एक-एक विकेट मिळाली.

loading image
go to top